जळगाव – भुसावळ शहरातील एकूण 57 स्वस्त धान्य दुकानांची जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी 27 विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या विशेष पथकात 7 उपजिल्हाधिकारी, 20 तहसिलदार यांचा समावेश होता.
या तपासणी मोहिमेमध्ये 10 स्वस्त धान्य दुकाने बंद आढळून आली, इतर रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डाबाबतची माहीत अद्यावत नसणे. ई पॉझ मशीनव्दारे 100 टक्के धान्य वाटप न करणे, अभिलेख अद्यावत न ठेवणे, पुस्तकी साठा आणि प्रत्यक्ष साठा यांच्यात तफावत असणे. अशाप्रकारचे गंभीर दोष आढळून आले. एकूण 57 दुकानांपैकी 24 दुकाने अकार्यान्वित असल्याचेही दिसून आले असून ही दुकाने ठरावीक व्यक्तीनाच जोडलेली असल्याचेही निदर्शनास आल्याने त्यांचेवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील कलम 3 व 7 नुसार फौजदारी कारवाई करण्याचे संकेतही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.