भुसावळ । सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या 26 उपद्रवींना शहर बंदी करण्यासंदर्भात बाजारपेठ पोलिसांनी प्रस्ताव तयार करून प्रांताधिकार्यांकडे पाठवले होते. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी 26 उपद्रवींना 21 ते 2 ऑक्टोबर दरम्यान सीआरपीसी 144 (2) प्रमाणे भुसावळ शहर बंदी केली आहे.
या उपद्रवींना केली शहरबंदी
इम्रान शेख अजिज उल्ला शेख (22, जाम मोहल्ला, भुसावळ) संदीप नरेश आळेकर (26, दिनदयालनगर, भुसावळ), जितेंद्र उर्फ मोनु रामदास कोल्हे (अमरनाथ नगर, भुसावळ), जावेद शहा आसिफ शहा (22, जाम मोहल्ला, भुसावळ), वसीम अहमद पिंजारी (22, जाम मोहल्ला, भुसावळ), निखील सुरेश राजपूत (20, दत्तनगर, भुसावळ), पवन मनोज ढंढोरे (22, वाल्मिक नगर, भुसावळ), जितु किसन गोडाले (26, वाल्मिक नगर, भुसावळ), जयकिसन तुळशिराम झाजोड (24, आरपीएफ बॅरेकजवळ, दुर्गामाता मंदिराजवळ, भुसावळ), जयेश दत्तात्रय चौधरी (19, दिनदयालनगर, भुसावळ), मोहम्मद इस्माईल उर्फ गोलु मोहम्मद आलम (2, जुनी पोलीस लाईन, भुसावळ), रशीदअली सज्जाअली (30, पापानगर, भुसावळ), आबीद शहा शब्बीर शहा (24, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ), बिलाल जहांगीर पटेल (20, काझी प्लॉट, भुसावळ), जितु उर्फ गोट्या एकनाथ घावरे (22, वाल्मिक नगर, भुसावळ), नंदु उर्फ कालु राजेंद्र बोयत (19, वाल्मिक नगर, भुसावळ), शेख फकीरा शेख युसुफ (29, आगाखान वाडा, भुसावळ), सागर साहेबराव अहिरे (31, शिवाजीनगर, भुसावळ), शेख हमीद शेख निसार (32, जुना कोंडवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ), चेतन प्रकाश सुरवाडे (व्हीआयपी कॉलनी, भुसावळ), अजय परशुराम पथरोड (24, वाल्मिक नगर, भुसावळ), मंगल ताराचंद तुंडायत (23, वाल्मिक नगर, भुसावळ), शैलांद्रे मनोज बोरसे (21, वाल्मिक नगर, भुसावळ), कुणाल राजु थनवाल (22, वाल्मिक नगर, भुसावळ), नटवरलाल उर्फ नट्टु चंडाले (21, वाल्मिक नगर, भुसावळ), जावेद उर्फ भुर्या अहमद पिंजारी (21, जाम मोहल्ला, भुसावळ)
एमपीडीच्या प्रस्तावांवरही होणार कारवाई
चोरी, हाणामारीसह गोळीबार, बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर एमपीडी (स्थानबद्ध) कारवाई करण्यासंदर्भात भुसावळातून सर्वाधिक सात प्रस्ताव जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे दाखल झाले आहेत. बुधवारी शेख तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम या आरोपीवर एमपीडीएची कारवाई झाल्यानंतर त्याची नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. या पद्धत्तीनेच लवकरच अन्य सहा प्रस्तांवावर कारवाई होण्याची शक्यता आहे.