भुसावळ : शहरातील महात्मा फुले नगर भागातील 36 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांपासून या विवाहितेचा शोध सुरू असून काही माहिती असल्यास भुसावळ शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.
आठ वर्षानंतरही विवाहिता बेपत्ता
कानातील सोन्याचे चाप मोडून येते म्हणून अनिता राजू पाटील (33, महात्मा फुले नगर, भुसावळ) ही विवाहिता 6 मे 2013 घराबाहेर पडली मात्र परतलीच नाही. सर्वत्र शोध घेवूनही विवाहिता न सापडल्याने पती राजू माधव पाटील (भुसावळ) यांनी शहर पोलिसात 15 मे रोजी तक्रार दिल्यानंतर हरवल्याची नोंद करण्यात आली. विवाहिता रंगाने सावळी, बांधा सडपातळ, कपाळावर गोंदलेले तसेच मराठी भाषा त्यांना बोलता येते. विवाहिता कुणास आढळल्यास भुसावळ शहर पोलिस ठाण्याशी (02582-222200) व हवालदार संजय सोनवणे (9049580162) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.