संघटनेत एकी असल्यास सरकारही घेईल दखल -आमदार संजय सावकारे

0

भुसावळात अ.भा.पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांचा सन्मान ; शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृतीपत्र मिळण्यासाठी प्रयत्न करणार -वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांची ग्वाही

भुसावळ- पत्रकार संघटनेत एकी असल्यास मागण्यांबाबत सरकार निश्‍चित दखल घेईल, असा आशावाद आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त शहरी व ग्रामीण पत्रकार संघाऐवजी केवळ एक संघटना ठेवून सर्वांनी एकत्र आल्यास निश्‍चित दबावगट वाढून समस्या सुटतील, असे सांगत माध्यमांची लोकप्रतिनिधींनाही भीती वाटत असल्याची कबुली दिली. अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून निर्भीडपणे लिखाण करीत पत्रकारीतेत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणार्‍या पत्रकारांचा शहरातील श्रीकृष्णचंद्र सभागृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार सावकारे बोलत होते.

पत्रकार लोकप्रतिनिधींचा आरसा -खासदार
लोकप्रतिनिधींच्या चांगल्या-वाईट कार्याचा निर्भीडपणे आढावा घेणारे पत्रकार हे लोकप्रतिनिधींचा आरसा म्हणून काम करतात, असे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. पत्रकारांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा वेगळा असून धाडसीपणे काम करतातना अनेक अडचणी येतात, असेही त्या म्हणाल्या. आमच्या उणीवांची जाणीव पत्रकारांनी निश्‍चित करावी कारण त्यामुळे सुधारणाही होतात, असेही त्यांनी सांगितले. भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी लोकशाहीत माध्यमांचे मोठे महत्व असून भुसावळात रेल्वे प्रशासनाला विकासकामे करताना माध्यमांचे मोठे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले.

सर्वच पत्रकारांना अधिस्वीकृतीसाठी प्रयत्न करणार -सुनील काळे
राज्यातील ठरावीक पत्रकारांना अधिस्वीकृती (अ‍ॅक्रीडेशन) कार्ड मिळते मात्र आपण स्वतः मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना आपल्या लेटर हेडद्वारे शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्याची मागणी करणार आहोत, असे आश्‍वासन वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिले. वरणगावात पत्रकारांसाठी सभागृहात बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगून चांगल्या कामांना जशी प्रसिद्धी दिली जाते तसेच चुकीच्या कामांना जनतेपुढे मांडण्याची माध्यमांची जवाबदारी असल्याचे त्यांनी सांगून जो काम करतो तोच चुकतो, असे त्यांनी सांगत डीआरएम यादव यांच्या कार्याचा गौरव केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, रेल्वे सिनी.डीसीएम सुनील मिश्रा, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पालिकेतील भाजपाचे गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक मुकेश गुंजाळ, जलील कुरेशी, बंगालसिंग चितोडीया आदींची उपस्थिती होती.

या पत्रकारांचा झाला सन्मान
पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत सराफ, दैनिक जनशक्तीचे विभागीय कार्यालय प्रमुख गणेश वाघ, नवभारतचे विजय ठक्कर, देशदूतचे डॉ.जगदीश पाटील, लोकशाहीच्या उज्ज्वला बागुल, लोकमतचे छायाचित्रकार श्याम गोविंदा, दिव्य मराठीचे कमलेश चौधरी, पुण्यनगरीचे वसीम शेख, देशोन्नतीचे ऑपरेटर भूपेंद्र महाजन आदींचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.