भुसावळ शहरात उद्या ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन

0

भुसावळ- रोटरी रेल सिटी व एन.के नारखेडे स्कूलच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ ऑलम्पिक स्पर्धा सोमवार, 28 रोजी रेल्वे ग्राउंडवर होत आहे. 100 मीटर धावणे, 400 मीर रीले, गोळा फेक, लांब उडी, भाला फेक, स्केटिंग, बुद्धिबळ, उंचउडी, क्यारम या स्पर्धा होणार आहेत. शहरातील 20 शाळेतील 450 खेळाडू सहभागी होणार आहेत. उद्घाटन रेल्वे सिनीयर डीसीएम सुनील मिश्रा यांच्याहस्ते सकाळी आठ वाजता होईल. दुपारी दोन वाजता दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे साहेब यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. प्रोजेक्ट चेअरमन मनोज सोनार व सह चेअरमन सागर वाघोदे असून यशस्वीतेसाठी क्लब अध्यक्ष महेंद्र उर्फ सोनू मांडे, सेक्रेटरी डॉ.मकरंद चांदवडकर व सर्व सदस्य परीश्रम घेत आहेत.