भुसावळ शहरात उद्या रक्तदान शिबिर

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

भुसावळ- नरेंद्र मोदी विचारमंचतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सोमवार, 17 रोजी रक्तदान शिबिर होत आहे. आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, ताप्ती एज्युकेशनचे अध्यक्ष मोहन फालक, माजी नगरसेवक बापू महाजन, धन्वंतरी ब्लड बँकेचे संचालक डॉ.प्रवीण महाजन आदींची उपस्थिती राहणार आहे. नाहाटा महाविद्यालयासमोर सकाळी दहा वाजता सुरू होणार्‍या शिबिरात दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन नरेंद्र मोदी विचारमंचतर्फे करण्यात आले आहे.