भुसावळ शहरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू
शवविच्छेदनानंतर कारण होणार स्पष्ट : घातपाताच्या चर्चेला शहरात ऊत : फॉरेन्सिक लॅकच्या पथकाकडून तपासणी
भुसावळ : शहरातील टिंबर मार्केटच्या जवळील आराधना कॉलनीजवळ रेल्वे रुळाजवळ शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारा स30 ते 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला असून या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने विविध चर्चांना जोर आला आहे. पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या हा खून नसल्याचे स्पष्ट केले असून संशयास्पद मृत्यू म्हणून तपासाला वेग दिला आहे.
मृतदेह आढळताच पोलिसांची धाव
शहर पोलिसांना मृतदेहाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजानन पडघण, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुणगहू, सहाय्यक फौजदार सैय्यद अली, सोपान पाटील, संजय पाटील, भूषण चौधरी, जाकीर मन्सुरी, चंद्रशेखर गाडगीळ यांनी धाव घेतली. दरम्यान, मयत तरुणाच्या नाकासह कानातून रक्तस्त्राव होत असल्याने शहरात तरुणाचा घातपाती मृत्यू झाल्याची चर्चा पसरल्याने नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
झाला
फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी
फॉरेन्सिक पथकाने मृत व्यक्तीच्या रक्ताचे नमुने व मातीचे नमुने घेतल तसेच घटनास्थळापासून काही अंतरावर पूर्वेेकडील बाजूला वायरींगच्या बंडलांजवळ रक्त सांडलेले असल्याने तेथे रक्त सुमारे 20 फुट अंतरावर पडलेले होते त्याचेही नमुने घेण्यात आले. मृताच्या डोक्याजवळ पोलिसांनी ब्लेड पोलिसांना आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. रेल्वे कर्मचारी अनिश वसंत चाबुकस्वार यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत. दरम्यान, प्रथमदर्शनी हा खून नसलातरी मृतदेहाची स्थिती पाहता आम्ही संशयास्पद मृत्यू म्हणून आम्ही तपासाला व ओळख पटवण्यास वेग दिला आहे. स्थानिक ट्रामा सेंटरमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून अहवालानंतर अधिक सांगता येईल, असे निरीक्षक गजानन पडघण म्हणाले.