भुसावळ शहरात भगवा सप्ताह राबवणार -मुकेश गुंजाळ

0

भुसावळ- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण भुसावळ शहरात भगवा सप्ताह राबविणार असून बाळासाहेबांच्या सच्चा शिवसैनिकांनी नागरिकांच्या मदत व मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी लढत राहावे व आपण नेहमीच अन्याविरुध्द लढा देत राहू, अशी ग्वाही प्रभाग क्रमांक 13 चे शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी येथे दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी शाखा प्रमुख धीरज वाढोणकर, अनिकेत चौधरी, उमाकांत शर्मा (नमा), संतोष गुंजाळ, वाहाब पटेल, रवी चंडाल, केशव पाटील, साईराज कुलकर्णी, सागर तायड, महावीर सोनटक्के, शिवाजी दावभट, भरत शिंपी, पवन वर्मा, नितेश मिश्रा व इतर शिवसैनिक उपस्थित होते.