भुसावळ शहरात सूर्यकन्येचा जन्मोत्सव उत्साहात

भुसावळ : सूर्यकन्या तापी नदीच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील तापी उत्थान एवंम उत्सव सेवा समिती, सप्तश्रृंगी माता बहूउद्देेशिय संस्था, सखी श्रावणी महिला संस्था व नॅशनल युथ क्लब या चार संस्थांच्या वतीने बुधवारी तापी नदीला महावस्त्र अर्पण केले. हिंदू धर्माच्या ग्रंथ व पुराणात उल्लेख असलेल्या व भुसावळ विभागासह जिल्ह्याला समृध्द करणार्‍या तापीनदी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साडी, चोळी, खणा नारळाने ओटी भरण्यात आली तसेच तापी तिरावर लोकवर्गणीतून तापी नदीचे भव्य मंदिर उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा प्रसंगी झाली.

तापी नदीला महावस्त्र अर्पण
तापी उत्थान एवं उत्सव सेवा समितीसह चार संस्थांनी राबविलेल्या या उपक्रमात कौस्तुभ देवधर, जयप्रकाश शुक्ला यांनी पौरोहित्य केले. प्रशांत वैष्णव यांनी सपत्नीक महापूजा केली. यावेळी डॉ विजय सोनी, रवीओम शर्मा, उमाकांत शर्मा, गोविंद अग्रवाल यांनी सहभाग नोंदवला. तापी नदीला प्रशांत वैष्णव, मेघा वैष्णव, अजय पाटील, राजश्री नेवे, भारती वैष्णव, रीतीका चौरसिया, दिनेश महाजन यांच्याहस्ते महावस्त्र अर्पण करण्यात आले. यानंतर तापी काठावर झालेल्या बैठकीत या ठिकाणी भव्य मंदिराची उभारणी करण्यात यावी, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा करण्यात आली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
तापी नदीवरील कार्यक्रमास माया चौधरी, वेदना झांबरे, भाग्यश्री नेवे, निता माहूरकर, प्रतिभा विसपुते, निकीता खुशलानी, मंदाकिनी केदारे, जे.बी.कोटेचा, कैलास उपाध्याय, दीपक जैन, सत्यनारायण शर्मा, अभिलाष नागला, राजेश मुळे, बल्लू हेडा, श्रीकृष्ण चोरवडकर, राजू गुरव, पुजा गुरव, सीमा नेवे, अनुराधा टाक, अ‍ॅड.गोकूळ अग्रवाल, संतोष टाक, दिलीप टाक आदी उपस्थित होते.

वृक्ष संवर्धनाचे आवाहन
तापी जन्मोत्सव सोहळ्यात सखी श्रावणी महिला मंडळाने 200 वृक्षांचे वितरण केले. या वृक्षांचे संवर्धन करीत जतन करणार्‍या नागरीकांना पुढील वर्षी तापी जन्मोत्सव सोहळ्यात 101 रुपये, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्हे देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अध्यक्षा राजश्री नेवे व प्रशांत वैष्णव यांनी दिली. या उपक्रमांमुळे शहरात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळण्याची आशा आहे.