भुसावळ शहर पोलिसांनी गुरांच्या हाडांची वाहतूक करणारे वाहन पकडले

भुसावळ : गो मांसाची वाहतूक एका वाहनातून होत असल्याचा संशय काही गो प्रेमींना आल्यानंतर त्यांनी फैजपूर ते भुसावळदरम्यान एका वाहनाचा पाठलाग करीत टेम्पो (एम.एच.20 ईजी 1491) शहरातील वाय पॉईंटला अडवले. यावेळी शहर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर वाहनाची तपासणी केली असता या वाहनात सुमारे 1200 क्विंटल गुरांची हाडे आढळून आली. या संदर्भात पोलिसांनी सखोल विचारणा केल्यानंतरही चालकाकडे या संदर्भात कुठलीही माहिती वा परवाना नसल्याने हे वाहन चौकशीकामी जुन्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या टेम्पोत चालकासह अन्य तीन मजूर व अन्य दोघे असल्याने त्यांची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल झाला नसल्याची पोलीस सूत्रांनी दिली.