भुसावळ : बेवारस अवस्थेतील पंक्चर दुचाकी भुसावळ शहर पोलिसांनी जप्त केली आहे. शहरातील भोई समाजाच्या मोकळ्या जागेत गेल्या दोन दिवसांपासून उभी असलेली बेवारस स्थितीतील दुचाकी (एम.एच. 14 ए.सी. 278) उभी असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाल्याने त्यांनी सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद व जहीर मन्सुरी यांना दुचाकी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी रीतसर पंचमाना करून ही गाडी ताब्यात घेतली. ही गाडी शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.