भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे डीबी पथक बरखास्त

0

भुसावळ- शहर पोलिस ठाणे हद्दीतील वाढत्या चोर्‍या-घरफोड्यांच्या घटना तसेच तालुक्यातील कंडारीत झालेली दंगल व अवैध धंदे रोखण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या शहर पोलिस ठाण्यातील डीबी पथक पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी बरखास्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोर्‍या-घरफोड्यांच्या घटना घडल्यानंतरही पोलिसांकडून या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोधण्यात यश आले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर डीबी पथक बरखास्त करण्यात आल्याची चर्चा असून कर्मचारी आता पोलिस गणवेशात दिसत आहेत मात्र पोलिस निरीक्षक ठोंबे यांनी कर्मचारी कमी असल्याचे कारण देत डीबी बरखास्त करण्यात आल्याचे सांगितले.