भुसावळ शहर व तालुक्यात 27 उपद्रवींना दहा दिवस शहरबंदी

भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे आदेश : नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचे काटेकोर नियोजन

भुसावळ : सामाजिक शांततेला अडचर आणू पाहणार्‍या 27 उपद्रवींना प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी 7 ते 17 ऑक्टोबर दरम्यान शहरबंदी केली असून त्याबाबत गुरुवारी आदेश काढले आहेत. नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली 68 जणांच्या शहरबंदीचे प्रस्ताव प्रांताधिकारी प्रशासनाकडे सादर केले होते.

आदेश निघताच अंमलबजावणीला सुरूवात
भुसावळ शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे तसेच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपद्रवींना शहरबंदी करण्याबाबत प्रस्ताव तयार करून ते भुसावळ व जळगाव येथील प्रांताधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी गत महिन्यात पाठविण्यात आले. प्रस्तावांची चौकशी करून प्रांताधिकारी सुलाणे यांनी गुरूवारी आदेश काढले. यात पहिल्या टप्यात 28 जणांचे आदेश काढले असून ते आदेश पोलिसांना प्राप्त होताच हे आदेश संबंधितांना बजाविण्याची प्रक्रीया तीन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी सुरू केली.

27 जणांना शहर बंदी
7 ते 17 ऑक्टोबर या काळात शहरबंदी केलेल्यांमध्ये शिवाजी सोपान साळुंखे, शम्मी प्रल्हाद चावरीया, शिव परशुराम पथरोड, विष्णू परशुराम पथरोड, चेतन पुंजाजी कांडेलकर, विलास काशीनाथ जाधव, निखील सुरेश राजपूत, मंगेश अंबादास काळे, पिरू मंगा गवळी, अमीत अशोक सोनवणे, जितू शरद भालेराव, कुंदन रामदास वानखेडे, शे.रशीद शे.मासूम, गिरीष गोकुळ जोहरी, अब्दुल एजाम अब्दुल सलाम, गौरव राजेंद्र वाघ, मोहम्मद ईस्माईल मोहम्मद आलम, हर्षल उर्फ छन्नू दत्तात्रय राणे, दीपक उर्फ टापर्‍या सुभाष सोनवणे, राहुल नामदेव कोळी, सचिन अरविंद भालेराव, नवाब मोहमद गवळी, नरेंद्र बाळा अरुण मोरे, शामल शशीकांत कोळी, अक्षय रतन सोनवणे, लक्ष्मण दलपत मोरे यांच्या शहरबंदी करण्यात आली असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.