भुसावळ शिवसेना तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांसह पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : जिल्हाधिकार्‍यांचे जमावबंदीचा आदेश मोडत मॉडल आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे भंग केल्याने शिवसेना तालुकाप्रमुखांसह दोन्ही शहर प्रमुख मिळून अन्य पदाधिकार्‍यांविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी शहरातील अशुद्ध पाण्यासह अमृत योजनेचे रखडलेले काम व रस्त्यांच्या दुर्दशेला घेवून शिवसेना पदाधिकार्‍यांनी पालिका आवारात निदर्शने करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पदाधिकार्‍यांविरुद्ध दाखल झाला गुन्हा
भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गोपनीय विभागाचे हवालदार राजेश बोदडे यांच्या फिर्यादीवरून शिवसेना भुसावळ तालुकाप्रमुख समाधान धर्मा महाजन, शहराध्यक्ष निलेश केशव महाजन, शहराध्यक्ष बबलू बर्‍हाटे, सामाजिक कार्यकर्ते दीपक धांडे, पवन नाळे, सोनी प्रदीप ठाकूर, योगेश बागुल, पिंटू भोई यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांचा आदेश मोडीत काढत शिवसैनिकांनी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी सांगितले.