भुसावळ शेतकी संघात आमदार संजय सावकारे गटाची सरशी

0
सहकार पॅनलला आठ जागांवर यश : माजी आमदार चौधरींच्या शेतकरी पॅनलला सात जागा
भुसावळ : आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागलेल्या भुसावळ तालुका शेतकरी संघाच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांच्या सहकार पॅनलला आठ तर माजी आमदार संतोष चौधरी व अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटीलय ांच्या शेतकरी पॅनलला सात जागांवर यश मिळाले. सकाळी दहा वाजेपासून सुरू असलेली मतमोजणी अतिशय संथ पद्धत्तीने सुरू असल्याने दुपारी तीन वाजता सर्व निकाल जाहीर झाले.
सहकार पॅनलला आठ जागा
15 जागांसाठी तब्बल 31 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. सहकार पॅनलला या निवडणुकीत आठ जागा मिळाल्या. त्यात अनुसूचित जमातीतून प्रशांत सुकदेव निकम, भटक्या विमुक्त जमातीतून बाळकृष्ण पोपट धनगर, सर्वसाधारण महिला गटातून माधुरी संजय पाटील, कमलाबाई तुकाराम पाटील तर व्यक्तीशा मतदारसंघातून सुरेश नारायण येवले व अनिल रामचंद्र भोळे तसेच सोसायटी मतदारसंघातून अनिल पंडित पाटील, कैलास सुकलाल पाटील विजयी झाले.
शेतकरी पॅनलला सात जागांवर यश
माजी आमदार संतोष चौधरी यांच्या शेतकरी पॅनलला या निवडणुकीत सात जागांवर यश मिळाले. त्यात इतर मागासवर्गीय गटातून गजानन गोपाळ सरोदे, सोसायटी मतदारसंघातून विलास प्रल्हाद देवकर, पंढरीनाथ तुकाराम पाटील, प्रवीण शांताराम पाटील, हेमंतराव प्रतापराव देशमुख, रामराव ढोले तर व्यक्तीशा मतदारसंघातून अशोक भास्कर सरोदे विजयी झाले.