भुसावळ सभापतीपदावर प्रीती पाटील यांची लागणार वर्णी !

0

6 जुलै रोजी निवडणूक ; वंदना उन्हाळे होणार उपसभापती

भुसावळ- पंचायत समितीच्या सभापती पदासाठी ठरल्याप्रमाणे प्रीती मुरलीधर (गोलू) पाटील यांना तर उपसभापती पदासाठी वंदना सदानंद उन्हाळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षांच्या कालावधीनंतर सभापती सुनील महाजन व उपसभापती मनीषा पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला होता तर नूतन सभापती पदासाठी 6 जुलै रोजी निवडणूक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ पंचायत समिती भाजपाचे चार तर राष्ट्रवादी व सेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे.