भुसावळ : सीआरएमएसचे मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया, झोनल वर्कशॉप सचिव पी.एन. नारखेडे,मंडळ सचिव एस.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी केंद्र सरकारने श्रम कायद्यात केलेले बदल व डीए थांबविण्याच्या निषेधार्थ सेंट्रल रेलवे मजदूर संघ पीओएच शाखेतर्फे काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
हे आंदोलन अध्यक्ष किशोर कोलते व सचिव डी.यू.इंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्रसंगी दीपक खराटे, ईश्वर बाविस्कर, विकास सोनवणे, मेघराज तल्लारे, हरीचंद सरोदे, स्वप्निल पाटील, प्रमोद बाविस्कर, राजेश सोनी, सुरेन्द्र गांधीले, कुणाल बोंडे, फारुख शेख, भूषण पाटील, रूबाब तडवी यांच्यासह पदाधिकारी, कमेटी मेंबर व कर्मचारी सहभागी झाले.