भुसावळ स्थानकावर अवैधरीत्या खाद्यपदार्थ विकणार्‍यांवर कारवाई

0

तीन अधिकारी नियुक्त ; पहिल्या दिवशी सात विक्रेत्यांवर कारवाई

भुसावळ- अवैधरीत्या खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या विके्रत्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने मोहिम उघडली असून मंगळवारी सात विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करीत त्यांच्याकडील लस्सीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईने अवैधरीत्या खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. डीआरएम आर.के.यादव यांच्या आदेशावरून तयार करण्यात आलेल्या कारवाई पथकात आरपीएफ अधिकारी, सीटीआय आणि कॅटरींग विभागाचे निरीक्षक अश्या तीन अधिकार्‍यांचा समावेश असल्याचे स्टेशन संचालक जी.आर.अय्यर म्हणाले.

कारवाईने उडाली खळबळ
मंगळवारी रेल्वे स्थानकावर अवैधरीत्या आणलेली लस्सी पथकाने जप्त केली तर या कारवाईने विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. रेल्वे स्थानकात अवैधरीत्या खाद्य पदार्थ विकणार्‍यांवर कारवाईचे आदेश डीआरएम आर.के.यादव यांनी स्टेशन डायरेक्टर जी.आर.अय्यर यांना दिले असून त्यानुषंगाने कारवाई सुरू करण्यात आली आहे. धडक कारवाईत सातत्य राहणार असल्याचे अय्यर म्हणाले.