भुसावळ- राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून तीन दिवसीय संपावर उतरल्याने भुसावळ विभागातील सरकारी कार्यालयांसह शाळांमध्ये आज सर्वत्र शुकशुकाट होता. दरम्यान, संपामुळे तहसील कार्यालयासह नगरपालिका कार्यालय व शाळांमधील कामकाज ठप्प झाले होते तर विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याऐवजी घरीच राहणे पसंत केले.
अशा आहेत मागण्या
सातवा वेतन आयोग द्यावा, थकीत महागाई भत्ता द्यावा, कर्मचारी भरती, महिला कर्मचार्यांना केंद्राप्रमाणे रजा, अनुकंपा नियम दुरुस्ती, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, आरोग्य खात्यातील परीचरांना किमान वेतन, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना कायमस्वरुपी सेवेत घ्यावे आदी मागण्यांच्या पूतर्ततेसाठी संप पुकारण्यात आला आहे.
यावलमध्ये शाळा-महाविद्यालयात शुकशुकाट
यावल- महराष्ट्र राज्य महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, मुंबई यांच्या आदेशानसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता 7 ते 9 दरम्यान राज्यव्यापी संपात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले. सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी, निवृत्तीचे वय 58 वरुन 60 वर्ष करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा तसेच मागील थकित महागाई भत्ते मिळण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तीन दिवसाच्या संपात सहभागी झाले.
यांचा संपात सहभाग
कार्यालय अधीक्षक आर.ई.पाटील, कनिष्ठ लिपिक के.एफ.देशमुख, जी.के.वाघ, बी.बी.पाटील, डी.डी.पाटील, ए.बी.पाटील, ए.डी.पाटील, एस.एस.अहिरे, एस.आर.ठाकुर, आर.सी.ठाकुर, आर.सी.सिसोदीया, एफ.सी.ठाकूर, पी.आर.पोहरे, राजु वराडे, व्ही.बी.येवले, शालिक डी.साकखे, आर.एन.साठे व सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
रावेर तहसीलबाहेर ठिय्या आंदोलन
रावेर- विविध मागण्यांसाठी रावेर तहसील कार्यालयात काम बंद आंदोलन करून सर्व कर्मचार्यांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात ए.व्ही.वसावे, एच.एन.राठोड, एम.बी.लडके, वाय.जे.मोहिनी, ए.यू.घटी, एच.जी.मुळे, ए.सी.तडवी, डी.व्ही.लहासे, आर.आर.भारंबे, यमुनाबाई तावडे, लक्ष्मीबाई कुरकुरे आदी शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
तहसीलदारांनी उघडले दालन
मंगळवारपासून सर्व शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्याने रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या कार्यालयाच्या दालनाचे स्वतःचे कुलूप उघडले.