भूकंपाने पालघर हादरले; घरांना तडे

0

पालघर: पालघर जिल्हा रविवारी रात्री भूकंपाने हादरून गेला. रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.१ एवढी नोंदवण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक घरांना तडे गेले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सावरोली, बोरमाळ आणि कोचाराई आदी ठिकाणचे ग्रामस्थ भीतीने घराबाहेर पडले. कुटुंबकबिल्यासह सर्वचजण घराबाहेर पडल्याने रात्रीच्यावेळी या दोन्ही तालुक्यात रस्त्यावर मोठी गर्दी दिसत होती. कालच्या भूकंपामुळे घरातील भांड्यांची पडझड होतानाच घरांना तडे गेल्याने लोक अधिकच घाबरले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी अख्खी रात्र जागून काढली. दरम्यान, करोनाच्या भीतीने घराबाहेर पडण्यास असलेली मनाई आणि दुसरीकडे भूकंपामुळे निर्माण झालेली दहशत, यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांची कोंडी झाली आहे.