भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये महिलेची हत्या

0

मुंबई : भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये एका 40 वर्षीय महिलेची धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सूरतहून मुंबईकडे येणाऱ्या भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये थरकाप उडवणारी ही घटना महिलांच्या डब्यात घडली. आरपीएफचे जवान गाडी चेक करत असताना त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेचं नाव दाडिया देवी शंकर चौधरी असे आहे. दाडिया देवी यांच्या गळ्यावर, दोन्ही हातावर आणि छातीवर शस्त्रानं वार करण्यात आलेल्या अवस्थेत गंभीर जखमी आढळून आल्या आहेत.

याप्रकरणी मुंबई सेंट्रल जीआरपीएफनं हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. लुटमारीच्या उद्देशानं दाडिया देवी यांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करित आहेत.