भूमापकाला दीड हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक

0

धुळे । तक्रारदारांनी धुळे शहर हद्दीत बांधीव घर खरेदी केले होते. सिटी सव्हेकडील प्रॉपर्टी कार्डवर तक्रारदाराने नाव लावण्याकरीता खरेदीखत व सूची नंबर 2 व प्रतिज्ञापत्र इ.कागदपत्रासह नगर भूमापक अधिकारी कार्यालय धुळे येथे अर्ज सादर केला होता. हा अर्ज नगर भूमापक अधिकारी आनंद ठाकुर यांना प्रात झाल्यानंतर त्यांनी प्रॉपर्टी कार्डवर नाव लावण्याकरीता दोन हजार रुपयाची मागणी केली.

संबंधीतांनी पोलिस उप अधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे याबाबत तक्रार केली. धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन गुरुवारी 24 रोजी सकाळी नगर भूमापन कार्यालय परिरक्षण भूमापक अधिकारी आनंद ठाकूर यांना 1 हजार 500 ची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. पोलिस उप अधीक्षक शत्रुघ्न माळी व पोलिस निरीक्षक देसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईने जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबड उडाली होती.