भूमिका, सिद्धांत सर्वोच्च जुनिअर गटात विजेते

0

मुंबई। सेंट्रल रेल्वे वेलफेअर हॉल येथे सुरु सलेल्या मुंबई जिल्हा कॅरम संघटना आणि सेंट्रल रेल्वे माटुंगा अयोजित सातव्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या 18 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या भूमिका नेटकेने शिवतारा कॅरम क्लबच्या अमुल्या राजूलाला अंतिम फेरीत 9-25,25-9,25-6 असे पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. तर 18 वर्षाखालील मुलांच्या एकेरी गटातील अंतिम लढतीमध्ये सिद्धांत वाडवलकरने ( बँक ऑफ इंडिया ) अंकित मोहितेला ( विजय कॅरम क्लब ) 25-3,25-0 असे सहज पराभूत करून विजय मिळविला.

पुरुष एकेरी गटातील उपउपांत्य लढतीच्या सामन्यात विश्‍वविजेत्या रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने सध्या फार्मात असलेल्या व स्पर्धेच्या प्रथम मानांकित जैन इरिगेशनच्या पंकज पवारला अटीतटीच्या लढतीत 25-13,24-25 व 25-5 असे तीन सेटमध्ये पराभूत केले व प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तर स्पर्धेतील तिसर्‍या मानांकित जैंन इरिगेशनच्या योगेश धोंगडेने द्वितीय मानांकित राष्ट्रीय विजेता व आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप देवरूखकरला 25-15,24-25 व 25-16 असे तीन सेटमध्ये नमविले.