जळगाव : दहावी परीक्षेतील भूमितीच्या पेपराला कॉपी करणार्या सहा विद्यार्थ्यांना सोमवारी डीबार करण्यात आले. या कारवाईने कॉपी बहाद्दरांमध्ये खळबळ उडाली. पारोळ्यातील एन.ई.एस.हायस्कूलमधील एका विद्यार्थ्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी यांनी तर नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील दोन विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या सदस्य प्रा.शुभांगी दिनेश राठी यांनी डीबार केले. अमळनेर तालुक्यातील मारवडच्या सु.हि.मुंदडे हायस्कूमधील तीन विद्यार्थ्यांना डाएटचे प्राचार्य गजानन पाटील यांनी डीबार केले.