ठाणे (सुरेश साळवे)। ठाणे महापालिका स्थानिक भूमिपुत्र असलेल्या फेरीवाल्यांचे संरक्षण करणार असून, पुरे असलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांची हद्दपारी करणार असल्याचे नवे धोरण आणत आहे. ठाण्याच्या विविध भागांत फुटपाथ गिळंकृत करीत धंदा करणार्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात पोलिसांच्या रिपोर्टमध्ये ठाण्यात गर्दी करणार्या फेरीवाल्यांमध्ये बाहेरून आलेल्या उपर्या फेरीवाल्याची आहे. त्यामुळे ठाण्यात गर्दी होत आले आहे. पालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांच्या शिस्तबद्ध नियोजन निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे सूतोवाच पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवाल्यांच्या विषयावर बोलताना केले. या प्रस्तावाला सर्वच नगरसेवकांनी मूकसंमती देऊन टाकली आहे.
महासभेत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या भाषणात 25 वर्षांत फेरीवाल्यांचे नियोजन करण्यात आले नाही. मात्र, ही समस्या नियोजनाशिवाय सुटणार नाही. यावर बोलताना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल म्हणाले माझे फेरीवाले आणि रिक्षावाले दुश्मन नाहीत. मात्र, त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. फेरीवाले हेदेखील परिवाराच्या उदरनिर्वाह करण्यासाठी करतात याकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. ठाण्यात बाहेरून येणार्या फेरीवाल्यांना मज्जाव करून स्थानिक ठाणेकर फेरीवाल्यांना संरक्षण देत त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यात फेरीवाले वेळेत आपला व्यवसाय करतील आणि निघून जातील फुटपाथ किंवा रस्त्यावर कब्जा संस्कृती याने नव्याने सुरू होईल. ठाणे शहराचे विविध भाग तयार करून त्यात त्या निर्धारित जागांवर सकाळी आणि संध्याकाळी वेळेनुसार फेरीवाल्यांना धंदा करता येईल. खरे आणि स्थानिक फेरीवाले कोण यासाठी प्रत्येक नगरसेवकाची त्या त्या विभागात मदत घेण्यात येईल. यामुळे कब्जाही नाही आणि फेरीवाल्यांचा धंदाही सुरू राहील, असे नियोजन करण्याचा मानस व्यक्त केला. मी आज आहे प्रयत्न करील उद्या मी जाणार आहे. पण ठाणे शहर तुमचे आहे. तेव्हा वेळेत फेरीवाल्यांनी व्यवसाय शिस्तीत करावा, वाहनचालकांनीही वाहने उभी करावी, पण शिस्तीत अशी संकल्पना सभागृहात मांडली. त्याला सर्वच नगरसेवकांनी होकार दिला.