दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजना
आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांची घोषणा
मुंबई :- राज्यातील दारिद्ररेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भूमिहीन कुटुंबांना उत्पन्नाचे साधन म्हणून जमीन खरेदीकरीता दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत संपूर्ण अनुदान देण्यात येईल अशी घोषणा आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत सदस्या देवयानी फरांदे यांनी राज्यातील दारिद्ररेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भूमिहीन कुटुंबांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना आदिवासी मंत्री विष्णू सावरा म्हणाले दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्ररेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी यापूर्वी लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान व ५० टक्के कर्ज दिले जात होते.परंतु सरकारने यामध्ये बदल केला असून आता शंभरटक्के अनुदान लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.