भूलथापा देऊन वृद्ध महिलेचे दागिने लांबवले

0

कल्याण : डोंबिवली पुर्वेकडील सोनारपाडा परिसरात जनाबाई निवास मध्ये राहनाऱ्या 60 वर्षीय वृद्ध महिला काही कामानिमित्त शीळ रोड परिसरातुन पायी जात होत्या .

यावेळी सोनार पाडा बस स्टॉप नजीक पोहचल्या असताना अचानक एका अज्ञात इसमाने त्यांना हटकले .आमचे शेठ साड्या वाटप करत आहेत असे आमिश दाखवत त्यांना अंतरावर नेत प्रसाद म्हणून त्याना केली खाण्यासाठी दिल्या .त्यानंतर या वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील 29 हजार रूपये किमतीची सोन्याची घनमाळ काढून घेत पळ काढला .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात दाखल करन्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .