मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमध्ये #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे नावे समोर आली. यामध्ये टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र, त्यावेळी भूषणने त्यांच्यावर लावलेल्या आरोपांना फेटाळून लावले होते. पण, आता त्यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याचं समजतंय.
मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये भूषण कुमारांवर लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या महिलेने केली आहे. या महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या आधारे पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असून त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला गेला नाही आहे.