भूसंपादन गैरव्यवहार प्रकरणी सतीश महाले व विनायक शिंदे अटकेत

2

अमळनेर प्रतिनिधी । धुळे येथील महामार्गावरील उड्डाण पुलात झालेल्या संपादीत जमिनीचा वाढीव मोबदलाच्या आर्थिक अपहार प्रकरणी धुळे येथील सतीश दिगंबर महाले विनायक वालचंद शिंदे, विनोद महाले व धुडकू मोरे या चार जणांवर रात्री अडीच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करून सतीश महाले व विनायक शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

अमळनेर पोलिसांनी या प्रकरणी संबंधीतांना समज देऊन सोडल्यानंतर पुन्हा वरिष्ठ पातळीवरून वेगाने चक्रे फिरली व हालचाली गतिमान झाल्या. पोलीस ठाण्यात संशयितांना हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार संशयित दाखल झाले होते. सदर संशयित पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी रात्री रावेर येथून इफ्तार पार्टी आटोपून थेट अमळनेर पोलीस ठाणे गाठले व पुन्हा आरोपींची सखोल चौकशी केली. यावेळी बँकेचे अधिकारी देखील चौकशीसाठी बोलावले गेले. जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा पथक यांनी देखील त्यांची कसून चौकशी केली यावेळी चौकशी करून धुळ्यातील शिवसेना महानगर प्रमुख सतीश दिगंबर महाले, माजी नगरसेवक विनायक वालचंद शिंदे, विनोद महाले, धुडकू मोरे आदी व्यक्ती यात असल्याचे निष्पन्न झाले. दिनेश विकास ठाकरे रा.पिंपरी, ता.धुळे ह. मु. रामबोरिस, ता. जि. धुळे यांच्या वडिलांची जमीन महामार्गावर उड्डाण पुलात संपादित झाली आहे तत्पूर्वी विकास ठाकरे यांनी ही जमीन धुडकू मोरे यांना विकली होती त्यावेळी त्यांना २६ लाख रुपये मिळाले होते त्या दरम्यान विकास ठाकरे यांचा मृत्यू झाला जमीन मात्र विकास ठाकरे यांच्या नावावरून वारसदार दिनेश ठाकरे यांच्या नावावरच राहिली होती.

शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रकल्पात संपादित जमिनीचा वाढीव मोबदला मिळणार असल्याचे कळताच धुळे येथील वरील संशयित आरोपींनी सदर दिनेश ठाकरे याच्याशी संपर्क केला व त्याला गाठून करार केला व पॉवर ऑफ अटर्नी म्हणून मोबदला मिळवून देण्याचे अमिष दाखवले . त्यानंतर सदर मोबदला प्राप्त झाल्यानंतर धुळे येथील ए यु बँकेत रक्कम जमा झाली होती मात्र ती एकरकमी रक्कम वटत नसल्याने ती नवीन एच.डी .एफ. सी.बँकेत वर्ग केली. त्यात ते बुधवारी बँकेत आले होते तेव्हा ते पोलिसांच्या हाती लागले. रात्री अडीच वाजेच्या सुमारास या चौघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आर्थिक फसवणूक, अपहरण, खंडणी, अट्रोसिटी अशा कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.