भेगडे पतसंस्थेच्या संचालकपदी दत्तात्रय नाटक

0
तळेगाव दाभाडे : पै.विश्‍वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी दत्तात्रय पंढरीनाथ नाटक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सहाय्यक निबंधक वडगाव मावळ व्ही.पी.कोतकर यांनी सभेचे अध्यक्ष म्हणून काम पहिले. संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये आमदार संजय भेगडे यांच्या मार्गदर्शखाली व संस्थापक गणेश भेगडे यांच्या उपस्थितीत ही निवड पार प्रक्ररया पार पडली. इतर पदाधिकार्‍यांच्या निवडी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष प्रकाश लोणकर, सचिव मंगेश सरोदे, खजिनदार संदीप शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालक, अर्थ नियोजन समिती सदस्य, कर्ज वितरण समिती सदस्य उपस्थित होते.
या आर्थिक वर्षात संस्थेचे 1 कोटी 8 लाख रुपये वसूल भाग भांडवल, 1 कोटी 77 लाख रुपये निधी, 10 कोटी 12 लाख रुपये ठेवी, 9 कोटी 57 लाख रुपये कर्जवाटप, 2 कोटी 28 लाख रुपये गुंतवणूक, खेळते भागभांडवल 15 कोटी 12 लाख रुपये असून सभासद संख्या 2869 आहे. सतत आँडीट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला आहे. अग्रगण्य पतसंस्था म्हणून तालुक्यात संस्थेची ओळख आहे. निवडीनंतर नवनिर्वाचीत संचालक दत्तात्रय नाटक यांनी आमदार बाळा भेगडे व संस्थापक गणेश भेगडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य गरजवंताना व्यवसायवृद्धीसाठी कर्ज वाटप करण्यात येईल असे सांगितले.