भेगडे स्कूलमध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर कार्यशाळा

0

तळेगाव दाभाडे : येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘नैसर्गिक आपत्ती व त्यावरील सुरक्षित उपाययोजना’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. नैसर्गिक आपत्तीवेळी कोणती दक्षता घ्यावी, आवश्यक त्या उपाययोजना, जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी काय करावे, यासंदर्भात मार्गदर्शक पंकज दर्शले यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

प्रात्यक्षिकांतून मार्गदर्शन
या कार्यशाळेप्रसंगी संस्थाध्यक्ष संदीप काकडे, मुख्याध्यापिका मीना अय्यर, पर्यवेक्षिका क्रांती कडू, वंदना नायडू उपस्थित होत्या. यावेळी पंकज दर्शले यांनी विद्यार्थ्यांना भूकंप, आग, पूर, दरड कोसळणे, या सारख्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपण तत्कालीन परिस्थिती पाहून तातडीची मदत कशी करावी? यासाठीची प्रात्यक्षिके दाखविली. तसेच रस्ते अपघातावेळी कशी मदत करावी, याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. विद्यार्थ्यांना असलेल्या शंका-कुशंकांचे निरसन दर्शले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुवना मेंगळे यांनी केले. आभारप्रदर्शन रसिका मांडे यांनी केले.