भेदाभेद करणारे लोक राष्ट्रनिर्माण करु शकत नाहीत

0

नंदुरबार। ब्राम्हणवाद जातींचा निर्माता आहे.जाती माणसांमध्ये भेदा-भेद निर्माण करतात. भेदाभेद करणारे लोक राष्ट्र निर्माण करु शकत नाहीत,त्यामुळे ब्राम्हणवाद संपविणे हाच खरा राष्ट्रवाद आहे,असे प्रतिपादन बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नितीन गणोरकर यांनी केले.ते येथील बामसेफच्या नंदुरबार जिल्हा अधिवेशनात बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादाभाई ढोढरे यांच्या हस्ते झाले.

वर्तमानात असणार्‍या जाती, पंथ, धर्म आले कुठून ?
यानंतर इरफान सैय्यद म्हणाले की, मानव वंशाची निर्मिती अफ्रिकेतून झाली.विज्ञानाच्या दृष्टीतून विचार केला तर अफ्रिकेतील एक मादा ही आपली सर्वांची माता आहे. तर मग वर्तमानात असणार्या जाती, पंथ, धर्म कुठून आले. याचा अभ्यास करण्याची गरज आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वप्नित सामुद्रे, शैलैंद्र वाघमारे, गोरखनाथ पवार, सुनिता पवार, दीपक पानपाटील, गजाजन खिल्लारे, संतोष नागमल, गौतम भामरे, संघमित्रा बेडसे, धनंजय वाघ यांनी परिश्रम घेतले.

माझ्या पूर्वजांना जात नव्हती
बामसेफचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रविण खरे तर प्रमुख पाहुणे म्हणून इरफान सैय्यद आदी उपस्थित होते.यावेळी गणोरकर पुढे म्हणाले की, जातीची मानसिकता आपल्याला विकासापासून दूर नेते.म्हणून आपण आपल्या जातीचा त्याग केला पाहीजे.ब्राम्हणवाद जाती निर्माण करतो,म्हणून आपण ब्राम्हणवादाचा नाश केला पाहीजे. मनस्मृतीच्या लिखाणापूर्वी माझ्या पूर्वजांची जात नव्हती तर वर्ण होता. शुद्रवर्ण व वर्ण व्यवस्था ही आर्याच्या आक्रमणानंतर निर्माण झाली.म्हणून आर्याच्या आक्रमणापूर्वी आम्ही या धरती मालक म्हणजे मुळ निवासी आहोत, माल असण्याची भावना गौरव देते. म्हणून जातीच्या ओळखीचा त्याग करुन मुलनिवासी ओळख आत्मसात केली पाहीजे, असे ते म्हणाले.