आळंदी : येथील सिद्धेगव्हाण (ता.खेड) मधील श्री भैरवनाथ महाराज मंदिरात श्रींचे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ गुरुवारी (दि.17) हरिनाम गजरात होणार आहे. अशी माहिती आदर्शगाव सिद्धेगव्हाणचे सरपंच शशिकांत मोरे यांनी दिली.
श्रींचे मंदिरात सिद्धेगव्हाणला मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा यात देवगंण व देवगंणा व भाविक भक्तगण या सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. नवीन मंदिराचा कलशारोहण समारंभ व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना गुरुवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. ह.भ.प.पंडित महाराज नागरगोजे, उपस्थित संत महंत, देणगीदार व समस्त ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.