भोंगळ कारभाराविरोधात धरणे

0

बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणे आणि मूलभूत सुविधांचा अभाव

पुणे । बाजार समितीच्या आवारात वाढती बेकायदेशीर अतिक्रमणे, तसेच अवैध बांधकामे, अवैध धंदे, मूलभूत सुविधांची कमतरता आदी विविध प्रश्‍नांकडे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने डोळेझाक केलेली आहे. तसेच वर्षानुवर्षे समस्या न सोडविल्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. बाजार समिती आवारात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय उपलब्ध नाही अवैध धंदे सुरू आहेत़ कॉस्मॅटिक साहित्य व केमिकल साहित्याची किरकोळ विक्री सुरू आहे़ आवारात कृषी माल सोडून इतर अनेक प्रकारची दुकाने आहेत. फळे व भाजीपाला विभागात एकेरी वाहतुकीचा होत असलेला बोजवारा आवारातील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. तसेच नााल्या-ओढ्यांवर अतिक्रमणेही वाढली आहेत.

केळी बाजारात इतर व्यवसायपरिसरातील हॉटेलसमोरील अवैध बांधकाम, पत्रे, शेड, जाळी टाकून अतिक्रमण केले आहे. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बाजार आवारात करण्यात येत आहे़  केळी बाजारात इतर व्यवसाय सुरू आहेत.  अशा प्रकारच्या अनेक अडचणी बाजार आवारात भेडसावत आहेत; त्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनाचा इशारा सध्या बाजार आवारातील समस्या प्रशासनाने सोडविणे गरजेचे आहे. त्या न सोडविल्यास येत्या काही दिवसातच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष बजरंग राजगुरू, युवा अध्यक्ष शतायु भगळे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा कापसे, महिला शहराध्यक्षा वैशाली राक्षे आदी उपस्थित होते.