भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

0

शहादा । शहादा येथील पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शेतकरी लाभार्थ्याना शेतातील पाईपांची गरज असतांना देखिल ते शेकडो पाईप अनेक महिन्यापासून पंचायत समितीच्या आवारात नष्ट होण्याच्या स्थितीत पडून आहेत.शहादा पंचायत समितीच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे शेतकरी लाभार्थ्यांना शेती कामासाठी प्रत्येकी 10 किंवा अधिक पाईप वाटप केले जाते. त्यासाठी लाभार्थींची यादी तयार करुन तीला मंजुरी दिली जाते. त्यानंतर लगेचच लाभार्थींना कुठल्याही प्रकारची फिरफिर न करविता ते लाभ दिला जातो.मात्र, शहादा तालुक्यातील शेतकरी अनेक महिन्यापासून समाज कल्याण विभागात गिरक्या मारीत आहेत.

अधिकारी व कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार
जिल्हाभरात शहादा तालुका सोडला तर सार्‍या तालुक्यातील लाभार्थींना पाईपासह सार्‍याच लाभांचे वाटप वेळेवर केले जाते. मात्र, शहादा तालुक्यातील वंचीत लाभार्थ्यांवर कायम अन्याय होत असतो. मग तो सौर कंदील वाटप असो वा पाईप सह इतर साहित्य असो सार्‍यामध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांचीच मनमानी कारभार चालतो.हा विभाग लाभार्थींना वंचित का ठेवतो. लाभार्थी मात्र,प्रत्येक वेळी फरफटतच राहतो. शहादयतील लाभार्थींना अशी सौतीची वागणूक देत असे राजकारण का केले जाते असा प्रश्न निर्माण होतो.

आदेशांना केराची टोपली
येथील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागअंतर्गत येणार्‍या लाभार्थींना याद्या मंजूर असल्यानंतर सुद्धा लाभापासून वंचित का ठेवले जाते…? हा विषय गुलदस्त्यात आहे. लाभार्थी अनेकदा प. स. सभापती, उपसभापती यांच्या कडे लाभाच्या वस्तू मिळात नाही अश्या तक्रारी करतात. त्यांनी अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना लाभार्थींना वंचित ठेऊ नका व त्यांच्या लाभाच्या वस्तू त्यांना त्वरित द्या असे अनेकदा आदेश देऊनही अधिकारी त्या आदेशांना केराची टोपली दाखवतात. ह्या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे.

लाभार्थींची मंजूर यादी तरी वंचित
या विभागात लाभार्थींची मंजूर यादी तयार असतांना देखील अधिकारी व कर्मचारी लाभार्थींना वंचित ठेवत असल्याची अनेकदा तक्रार पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीकडे तोंडी स्वरुपात केली असल्याचे लाभार्थीं कडून बोलले जात आहे.शेतकर्‍यांसाठी हे पाईप सध्या खरीप हंगाम व पावसाळा सुरू असल्यामुळे अत्यावश्यक आहेत. मात्र,अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे हे वंचीत गरजू लाभार्थी चे शेकडो पाईप आत्ता पूर्णतः खराब अवस्थेत आहेत. हे पाईप काही लाभार्थींना तपासून पाहिले असता ते पूर्णतः निष्काम अवस्थतेत आले आहेत. ह्या पाईपपांना शेतात नेल्यास ते काहीही कामाचे नाहीत, असे लाभार्थींचे म्हणणे आहे.