जळगाव । शहरातील भोईटेनगरात 36 वर्षीय तरूणाने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडकीस आली आहे. सचिन रमेश जाधव असे मयत तरूणाचे नाव आहे. तर याप्रकरणी वाल्मिक माणिकराव देशमुख यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सचिन जाधव हे मजुर फेडरेशन येथे शिपाई म्हणुन कार्यरत होते. सोमवारी सकाळी 11 वाजुन सुध्दा सचिन हा कामावर आला नाही, म्हणुन मजुर फेडरेशन येथील वाल्मिक देशमुख यांनी सचिन यांच्या मोबाईलवर कॉल केला. परंतू, सचिन प्रतिसाद देत नसल्याने देशमुख यांनी 11.45 वाजेच्या सुमारास भोईटेनगर येथे येवून सचिन यांच्या घराचा दार ठोठावला. प्रतिसाद देत नसल्याने दार ओढून पाहिल्यानंतर सचिन हे घरातील किचनरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आल्यानंतर वाल्मिक देशमुख यांनी लागलीच शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधला. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही यांनी लागलीच घटनास्थळी जावून भेट पाहणी केली. पंचनामा करत मृतदेह खाली उतरविण्यात आला. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.