शहादा । येथील भोईराज युवा मंच यांनी विविध सामाजिक प्रबोधनाचे विषय घेऊन भोईसमाज अंतर्गत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि 10 वी 12 वीच्या विद्यार्थींना वही वाटप व अमूल्य मार्गदर्शन असे शानदार कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.समाजातील युवक- युवतींमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी बोलके व्हावे, स्टेज डएरिंग वाढावी यासाठी हि स्पर्धा झाली. लेक वाचवा लेक शिकवा, व्यसनाचे दुष्परिणाम, निसर्ग आणि मानव, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती, भारतीय सेनाअशा विविध सामाजिक विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार मांडलेत. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज कार्यकर्ते मंगदादा साठे, यावेळी नंदुरबार जिल्हा भोईसमाज सेवा संघाचे सचिव रवींद्र वानखेडे, मोहन मोरे सर शहादा, उपअभियंता आर. एन वाडीले, नंदुरबार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सामाजिक विषयांवर विचार
कार्यक्रमाला, सुपडू खेडकर, योगेश खेडकर, पंकज शिवदे, महेंद्र बोरदे, संजय साठे, अशोक शिवदे, जयवंत मोरे, सुवर्णा साठे, नंदिनी मोरे,पायल खेडकर उपस्थित होते.हि स्पर्धा मोहन साठे, मिलिंद वाडीले, राजा खेडकर , किशोर मोरे, धनेश्वर तामसे, उमाकांत शिवदे, सुरेश वाडीले, योगराज खेडकर, राहुल साठे, मयूर शिवदे, यश वाडीले, निनाद शिवदे, रिंकू खेडकर, शरद साठे संदीप मोरे, कार्तिक खेडकर आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून दिनकर वाडीले , रेखा जयस्वाल यांनी काम पाहिले. तर सूत्रसंचालन, प्रा. मोहन मोरे यांनी केले, आभार अशोक शिवदे, मिलिंद वाडीले यांनी मानले. स्पर्धेचा निकाल लागलीच घोषित करण्यात आला आणि विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे. गट पहिला, प्रथम- पायल अनिल साठे, द्वितीय- भूमिका विजय तामखाने, तृतीय- हर्षदा अनिल रामोळे, उत्तेजनार्थ- ओम भोई,इंग्रजी भाषा गट पहिला, प्रथम – रक्षिता सोनवणे, द्वितीय- गायत्री गजानन भोई, गट दुसरा, प्रथम- समृद्धी सुनील साठे, द्वितीय- कुणाल रवींद्र खेडकर, तृतीय- मानसी रामचंद्र खेडकर, उत्तेजनार्थ- गायत्री राजू साठे, गट तिसरा, प्रथम- महेश राजेंद्र साठे, द्वितीय- संदीप सुदाम मोरे, तृतीय- नितीन चंद्रकांत शिवदे, उत्तेजनार्थ- एकनाथ सुदाम भोई.