भोई समाजाला आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात मोर्चा काढणार

0

जळगाव येथे भोई समाज आरक्षण परीषद अनेक ठराव पारीत

मुक्ताईनगर- गेल्या अनेक वर्षांपासून भोई समाजाला आरक्षण देण्याची मागणी असतानाही शासनाला अद्यापही जाग आली नसल्याने आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात मोर्चा काढण्याचा निर्धार जळगाव येथे झालेल्या जळगाव जिल्हा भोई समाज युवा फाउंडेशनच्या भोई समाज आरक्षण परीषदेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भोई समाज विकास मंडळाचे अध्यक्ष एस.भोई हे होते.

यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून छोटू भाऊ भोई, यशवंत भोई, महारु शिवदे, अशोक रामचंद्र मोरे, भगवान ओंकार शिवदे, किशोर भिका ढोले, साहेबराव मोरे, शिवाजी एकनाथ भोई, संतोष पंडित भोई, अमोल राजेंद्र भोई, सीताराम बंडू भोई, भगवान नथ्थु भोई, रवींद्र खुशाल भोई, रवींद्र श्रावण शिवदे, भीमराव सीताराम भोई, सुनील जावरे, प्रताप मोरे, दीपक ढोले, अरुण भागवत भोई, मनोज भास्कर भोई,भुरा भोई, रवींद्र भोई, विनायक वाडेकर हे प्रमुख उपस्थित होते.

विविध ठरावांना मंजुरी
फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन तसेच मोर्चा काढणे, 15 पंधरा तालुक्याचे दौरे घेऊन समाजाच्या आरक्षणासंदर्भात दिशा ठरवणे, आरक्षण मागणीसंदर्भात आराखडा व मसुदा तयार करणे, प्रत्येक आमदारांना भेटून निवेदन देणे समस्त, भोई समाज संघर्ष कृती समिती स्थापन करणे या ठरावांना मंजुरी देण्यात आला. दरम्यान, 27 जानेवारी रोजी नाशिक येथे होणार्‍या आरक्षण बैठकीसाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव जाणार असल्याचे ठरवण्यात आले. समाजाच्या विविध असलेल्या संघटनांना एकत्रीत संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आणून एकसंघ समाज निर्माण करणे सर्व वधू-वर परिचय मेळावा घेणे यासारखे विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितू जावरे, जीवन भोई, मोहन भोई, राहुल भोई, प्रवीण भोई, सागर भोई, संजय भोई, गणेश मोरे, बाळासाहेब मोरे, बाबूलाल गणेश भाई, चंदू दिगंबर भोई, ज्ञानेश्वर शिंवदे, राजेश भोई, समाधान भोई, दीपक खिरोडकर, पवन भोई, राजेंद्र मोरे, विजय भोई, मुकेश भोई, कमलेश मोरे यांनी सहकार्य केले.