जळगाव : तालुक्यातील भोकर (भादली) येथील सचिन रामचंद्र सोनवणे (वय 27) या तरुणाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.
भोकर येथील रामचंद्र खंडू सोनवणे यांच्याकडे अल्प जमीन आहे. मुलगा सचिन सोनवणे हा वडील रामचंद्र यांना उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होता. गुरुवारी नेहमीप्रमाणे सर्व कुटुंब शेतात गेले होते. सचिन हा घरी एकटाच होता.
वडील आल्यावर प्रकार उघड
सचिनने गुरुवारी राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घराचा दरवाजा अपूर्ण लावलेला होता. वडील रामचंद्र शेतातून घरी आल्यावर दरवाजा उघड्यावर मुलगा सचिन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तत्काळ मोठा मुलगा आप्पा व शेजारच्यांना प्रकार कळविला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिनला जिल्हा रुग्णालयात हलविता. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी सचिनला मृत घोषित केले.
नातेवाइकांचा आक्रोश
सचिन सोनवणे यांनी मृत्यूचे कळताच त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. सचिनची आई पत्नी, वडील तसेच मावशी इतर नातेवाईकांनी आक्रोश केला. सचिनच्या पश्चात आई निर्मलाबाई, वडील, भाऊ, पत्नी निशा असा परिवार आहे. तीन वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. सचिन नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे कळू शकलेले नाही. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.