वरणगाव : नगरपालिकेच्या मागणी नुसार वरणगाव शहरातील भोगावती नदी च्या पात्राचे खोलीकरण सुशोभीकरणा चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे सदर भोगावती नदी च्या वरणगाव शहराच्या आवती भोवती दोन्ही बाजूने पुररक्षक भिंत उभारण्याची मागणी व भोगावती नदीत ओझरखेडा धरणातील पाणी सोडण्याची मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री ना गिरिषभाऊ महाजन व अधीक्षक अभियंता पाटबांधारे यांच्याकडे केली आहे qत्यानुसार आज विधानपरिषदेतील आमदार चंदूलाल पटेल व तापी पाटबंधारे चे कार्यकारी संचालक श्री व्ही डी पाटील यांनी वरणगाव शहरात येऊन भोगावती नदी पात्राची पाहणी केली पूर रक्षक भिंत कश्या पद्धतीने उभारता येईल व पाणी नदी पात्रात सोडण्या ची पाहणी आज केली त्यानुसार कार्यकारी संचालक श्री व्ही डी पाटील यांनी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखलाक कामगार नेते मिलिंदजी मेढे साजिद कुरेशी शेख सईद ज्ञेनेश्वर माळी उपस्तिथ होते या प्रसंगी आमदार चंदुलाल पटेल यांनी सांगितले की राज्याचे जलसंपदामंत्री ना गिरिषभाऊ महाजन यांनी शेतकऱयांची शेती इंच इंच ओलित खाली आल्या पाहिजे त्यादृष्ट्रीने कोटयावधी चा निधी मंजूर करीत आहे त्यात वरणगाव नगरपरिषदेने भोगावती नदी च्या दोन्ही बाजूने पुररक्षक भिंत करण्याची मागणी केली आहे त्याच प्रमाणे नदी पत्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे त्यांचा पाठपुरावा मी जातीने लक्ष घालून करणार आहे भाजपा सरकार ही जनहीताचे कामे करीत असून वरणगाव शहरात जो विकासा कामांचा धडाका सुरू आहे ते गावाच्या विकासाचे धोतक आहे लवकरच भोगावती नदी चे रूप पलटणार असून पर्यटन क्षेत्र म्हणून भोगावती नदी पाहायला नागरिक येतील असा विश्वास आमदार चांदूलाल पटेल यांनी यावेळी दिला नगरपालिकेत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आमदार चंदुलाल पटेल यांचा वकार्यकारी संचालक व्ही डी पाटील यांचा सत्कार केला यावेळी नगरपालिकेत नगरसेवक राजेंद्र चौधरी कामगार नेते मिलिंदजी मेढे माजी सरपंच साजिद कुरेशी माजी सरपंच शेख सईद उपस्तिथ होते.