भोजे येथील आग पिडीत कुटुंबातील आशाचे लग्न थाटात

0

वरखेडी । येथून जवळच असलेल्या भोजे या गावी 22 एप्रिल रोजी विज वितरण कंपनीच्या डीपीजवळ शॉट सर्किट होऊन आग लागली होती. या आगीत विधवा महिला लीलाबाई गुणवंत उभाळे यांच्या घराला आग लागून त्यांच्या मुलीच्या 5 मे 2017 होऊ घातलेल्या लग्नासाठीच्या सर्व साहित्य आगीत जळून गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट आले होते. मात्र, यावर जलसंपदामंत्रींपासून ते समाजातील सर्व स्तरातून या लग्नासाठी आर्थिक मदतीचा हात लीलाबाई उभाळे यांना मिळाल्याने यांची मुलगी आशा हिचा ठरला प्रमाणे 5मे शुक्रवार रोजी सध्याकाळी भूषण यांच्याशी मोठ्या धुमधडाक्यात गोरज मुहूर्तावरपार पडला.

संपूर्ण पाचोरा तालुक्याने व भोजे ग्रामस्थांनी पालकत्व स्वीकारलेल्या आशाच्या लग्नास अधिकारी, आमदार, जि.प.सदस्य, माजी आमदार, सामजिककार्यकर्ते, पत्रकार, विविध क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली. आपल्याच कुटुंबातील विवाह असल्याप्रमाणे प्रत्येक जण सहभागी झाले होते.

यांनी दिली आर्थिक मदत
या लग्नासाठी जिल्हाचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी 15000 रु मदत पाठवून वधू.वरास शुभ आशीर्वाद संदेश पाठवला. तर मजी आमदार दिलीप वाघ, आमदार किशोर पाटील , सचिन सोमवंशी , पाचोरा.प.स.उपसभापती अनिता पवार , जि.प. सदस्य मधुकर काटे, भाजपाचे डॉ शांतीलाल तेली ,दत्ताभाऊ बोरसे, भाजपचे युवनेता नगरसेवक अमोल शिंदे, माजी प.स.सदस्य बाबुराव घोगळे, माजी जि.प सदस्य उद्धव मराठे, नगरसेवक विकास पाटील पाचोरा, नगरसेविका सुचिता वाघ, ज्योती वाघ , मंगला पाटील तालुक्यातील विविध संस्थाचे पदधकारी मोठ्या संख्ये उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वधू वरांना त्यांचा भावी आयुष्यासाठी शुभआशीर्वाद दिले. सूत्रसंचालन प्रा.सी.एन.चौधरी यांनी केले.