भोणेजवळ भीषण अपघात ; एक ठार, दुसरा गंभीर !

Fetal Accident Near Bhone ; One Killed, The Other Serious ! धरणगाव : भरधाव डंपरने दुचाकीला उडविल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. अमळनेरकडे जाणार्‍या रस्त्यावरील भोणे फाट्याजवळ हा अपघात झाला. रविवार, 4 रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. मयत व जखमी नेपानगरचे असल्याची माहिती आहे.

भरधाव डंपरच्या धडकेने अपघात
धरणगावकडून अमळनेरकडे जाणार्‍या भरधाव आयशरने दुचाकीवरून जाणार्‍या दोघांना भोणे फाट्याजवळ उडविल्याची घटना रविवार, 4 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातात एक जण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

खासदारांनी केली मदत
खासदार उन्मेश पाटील हे रस्त्याने जात असतांना अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेवून जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात रुग्णालयात रवाना केले आहे. अपघातात सतीश जैस्वाल हा मयत झाला असून त्याचा मित्र संजय सीताराम महाजन हा तरुण जखमी झाला आहे.