भोपाळ : भोपाळ सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुुनावली. घटनेचे गांभीर्य आणि आरोपांचे स्वरुप पाहता दोषींना जन्मठेप देण्याची मागणी सरकारी वकील रीना वर्मा आणि पी. एन. सिंह यांनी केली होती. या प्रकरणी 28 जणांची साक्षही महत्वपूर्ण ठरली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर पीडितेचे पालक म्हणाले, दोषींना फाशी मिळाली पाहिजे.
पण या निकालानेही आम्ही समाधानी आहोत. दोषी जीवंत असेपर्यंत तरुंगातच राहतील. त्यामुळे ते असे गुन्हे करणार नाहीत. सरकारी वकील रीना वर्मा म्हणाल्या, या निकालाने लोकांचा कायद्यावरील विश्वास वाढेल. सामूहिक बलात्काराचे हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकारात मोडते. आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत तुरुंगातच राहतील.