भोयर दापत्य ठरले विठ्ठलाच्या पूजेचे प्रथम मानकरी

0

पंढरपूर : आज गुरुवारी २६ रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाची पूजा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक विठुरायाचे दर्शन घेतले. दरम्यान यंदा प्रथम दर्शनाचे मान भोयार दापत्याला मिळाले आहे. हिंगणघाट तालुक्यातील डवलापुर गावातील भोयर दापत्याला पंढरपुरला महापूजा करण्याचा मान मिळाला. विठुरायाची पूजा आपल्या हातून व्हावी, असे प्रत्येक भक्‍ताला वाटते. विठ्ठलाची अशीच भक्‍ती करणाऱ्या डौलापूर येथील कवडू भोयर यांच्या कुटुंबाला विठ्ठलाच्या प्रथम पूजेचा मान मिळाला. यांच्यासह भोयर दाम्पत्य विठ्ठलाची महापूजा केली आहे.

कार्तिक एकादशीला होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळेला डौलापूर येथील कवडू भोयर व त्यच्या पत्नी कुसुम यांना पूजेसाठी पंढरपूर येथे आमंत्रित केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत हे दाम्पत्य आज गुरुवारी पहाटे पंढरपूर येथे शासकीय पूजेत सहभागी होऊन पुजा केली.

परंपरेनुसार एकादशीच्या दिवशी दर्शनार्थ्यांच्या रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दाम्पत्याला हा मान दिला जातो. मात्र कोरोनामुळे मंदिर बंद आहे. यंदाची पंढरपूरची कार्तिकी यात्राही मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय महापूजेच्या वेळी प्रथम पूजनाचा मान मंदिरात सेवा देणाऱ्या विणेकऱ्यांमधून एकाला देण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला. मंदिरात सतत वीणवादन करीत पहारा देणाऱ्या सहा वीणेकऱ्यांमधून कवडू भोयर यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात आली होती .