भोरखेडा – गलंगी रस्त्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर

0

शिरपूर । माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिश पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील भोरखेडा-गलंगी रस्त्यासाठी 5 कोटी रुपयांचा भरघोस आर्थिक निधी मंजूर झाला आहे. शिरपूर चोपडा मार्गावरील भोरखेडा-गलंगी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी व दुरुस्तीसाठी माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते.

याप्रमाणे 5 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाल्याने माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या अहोरात्र सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त् करण्यात येत आहे.