भोरखेडा येथील पटेल मराठी प्राथमिक शाळेत पालक शिक्षक मेळावा

0

शिरपूर । तालुक्यातील भोरखेडा येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती सभा व पालक शिक्षक मेळावा घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती सभेचे अध्यक्ष जितेंद्र राजपूत होते. समितीचे उपाध्यक्ष सचिन राजपूत, असली गावाचे माजी सरपंच उखडू कोळी, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सुर्यवंशी व समितीचे सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त सादर करण्यात आले. शालेय पोषण आहार, शालेय गणवेश याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून पालकांना आजच्या जीवनातील शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच शाळा सिद्धी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. सभेत प्रत्येक वर्गशिक्षकाने आपल्या वर्गाविषयी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर सर्व सदस्यांनी शालेय पोषण आहाराची चव घेवून समाधान व्यक्त केले. सूत्रसंचलन शाळेचे उपशिक्षक व्ही.यु. ठाकरे यांनी केले. आभार के.डी.राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.