भुसावळ : भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, भुसावळ शाखेने 19 एप्रिल 2022 या रोजी चौथ्या सामूहिक विवाह सोहळा घेण्याचे नियोजन केले आहे. शनिवारी पंचायतीच्या बैठकीत हा निर्णय झाला.
विवाहासाठी नोंदणी आवश्यक
ज्या विवाहेच्छुकांना सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हायचे असेल त्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. या सोहळ्यात वैदिक पद्धतीने विवाह विधी होईल तसेच जोडप्यांना संस्थेतर्फे गॅस शेगडी, सिलिंडर. मिक्सर, कुकर, संसारोपयोगी साहित्य, पैठणी व ड्रेस भेट म्हणून दिले जाईल. विवाहोच्छूक युवक व युवतींनी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे कार्यालय, पुरूषोत्तम मेडिकल जामनेर रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपक्रमाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी केले आहे. या बैठकीला कुटुंब नायक रमेश पाटील, अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, सुहास चौधरी, आरती चौधरी, परीक्षित बर्हाटे, नीळकंठ फालक, महेश फालक, मंगला पाटील, डिगंबर महाजन, शरद फेगडे, रघुनाथ चौधरी हे संचालक उपस्थित होते.