भोरगाव लेवा समाजाचे पाडळसेत फेबु्रवारीत अधिवेशन

0

यावल– तालुक्यातील पाडळसे येथे 4 फेब्रुवारी रोजी भोरगाव लेवा पंचायतीचे एक दिवशीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात समाजातील समस्यांचे चिंतन व मंथन होणार आहे. त्यामुळे सर्व लेवा समाज बांधवांनी अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी येथे केले. शहरातील बाजार समितीच्या सभागृहात समाजबांधवांची बैठक झाली. आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार रमेश चौधरी, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे, जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहेते, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, बाजार समितीचे संचालक नारायण चौधरी, राकेश फेगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना कुटुंब नायक रमेश पाटील यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे निमत्रंक संपूर्ण यावल तालुका आहे. तालुक्यातील समाज बांधवांवर मोठी जबाबदारी आहे. तेव्हा प्रत्येकाने या करीता पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आभार प्रशांत चौधरी यांनी मानले.