भोरला 25 वर्षीय युवकाची आत्महत्या

0
रावेर: – तालुक्यातील भोर येथील 25 वर्षीय युवकाने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आशिश शांताराम सांगळे (25) असे मयत युवकाचे नाव आहे. सांगळे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली.  ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी मृत घोषित केले. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.