चाळीसगाव – चाळीसगाव धुळे राष्ट्रीय महामार्ग 211 लगत असलेल्या भोरस बु शिवारातील शेतातील विहीरीत 35 ते 40 वर्षीय ईसमाचा मृतदेह मिळुन आला असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव धुळे महामार्ग क्रमांक 211 लगत भोरस बु (ता चाळीसगाव) शिवारातील अमृत जिनींगजवळ असलेल्या रमेश चौधरी यांच्या शेतातील विहीरीत 7 जानेवारी 2019 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास 35 ते 40 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळुन आला आहे. रमेश चौधरी यांची शेती ठोक्यावर करण्यासाठी भोरस बु येथील एक शेतकर्याने घेतली आहे. नेहमीप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सदर शेतकरी विहीरीतील मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहीरीत अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला ही माहिती त्यांनी गावात सांगीतल्यावर पोलीस पाटील सचिन अशोक पाटील यांनी घटनास्थळी जावुन खात्री करुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन पोनि प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि जगदीश मुलगीर व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळावर जावुन पंचनामा केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउनि जगदीश मुलगीर करीत आहेत. दरम्यान मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही सदर ईसम कोण, कोठुन आला व विहीरीत पडला कसा याचा शोध पोलीस घेत आहेत.